अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने स्पष्ट केलं आहे की रशियन तेलाची खरेदी थांबवली जाणार नाही. इंधन दर आणि महागाई नियंत्रणासाठी रशियन तेल महत्त्वाचं असून, भारत आपल्या राष्ट्रीय हितानुसारच निर्णय घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ट्रम्प यांच्याही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारत आपली ऊर्जा धोरण ठामपणे पुढे नेणार आहे.












