दिल्ली विधानसभेत आता कागद नाही, फक्त स्क्रीन! पेपरलेस उपक्रमांतर्गत सर्व ७० आमदारांना iPhone 16 Pro वाटप करण्यात आले असून, या यादीत विरोधकांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह सर्व मंत्र्यांना नवीन टॅबलेट आणि iPad देखील देण्यात आले आहेत. ‘नेशनल ई-विधान ॲप्लिकेशन (NeVA)’ च्या लाँचिंगनंतर हा डिजिटल बदल करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विधीमंडळाचे कामकाज अधिक आधुनिक आणि कागदरहित होणार आहे. मात्र, इतक्या महागड्या गॅजेट्सवर खर्च होणे हे सामान्य नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. लोकांचा पैसा टेक्नोलॉजीवर खर्च व्हावा की सेवांवर, यावर आता राजकीय चर्चा रंगू लागली आहे.












