Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कोलकातानं बांगलादेशी खेळाडूला रिलीज करावं; वादाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा आदेश
क्रीडा

कोलकातानं बांगलादेशी खेळाडूला रिलीज करावं; वादाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा आदेश

कोलकातानं बांगलादेशी खेळाडूला रिलीज करावं; वादाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा आदेश

Mustafizur Rahman : आयपीएल 2026 साठी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला खरेदी केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीकेचा सामना करत आहे. चाहत्यांसह अनेक राजकारण्यांनी केकेआरवर टीका केली आहे. केकेआरनं अलीकडेच आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी झालेल्या मिनी-लिलावात मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात विकला गेलेला तो एकमेव बांगलादेशी खेळाडू होता. 30 वर्षीय बांगलादेशी गोलंदाजाच्या वादानंतर, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी केकेआरला मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्यास सांगितलं आहे.

काय म्हणाले सैकिया :

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयनं केकेआर फ्रँचायझीला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला (Mustafizur Rahman) संघातून सोडण्याचे निर्देश दिले आहेत. बीसीसीआयनं असंही म्हटलं आहे की जर केकेआरनं बदली खेळाडूची विनंती केली तर बीसीसीआय बदली खेळाडू देईल.

बीसीबी अध्यक्षांनी मुस्तफिजूर रहमानबाबत एक निवेदन जारी केलं :

30 वर्षीय मुस्तफिजूरच्या वादानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) नं देखील एक निवेदन जारी केले. बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही क्रिकेटचे लोक असल्यानं शेवटपर्यंत संपूर्ण प्रकरणाचे अनुसरण करु. आम्ही या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहण्यावर विश्वास ठेवतो. मुस्तफिजूर रहमान हा कोलकाता नाईट रायडर्सचा एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. त्यामुळं, काय होते ते आम्ही पाहू. आम्ही शेवटपर्यंत याचं अनुसरण करु. आम्ही नेहमीच क्रिकेटच्या खेळाला प्रोत्साहन देतो. भारत आमचा शेजारी आहे आणि आमचे त्यांच्याशी खूप चांगले क्रिकेट संबंध आहेत.”

केकेआर आणि सीएसकेने रहमानला खरेदी करण्यात दाखवला होता रस :

आयपीएल 2026 चा मिनी-लिलाव डिसेंबरमध्ये झाला होता. या दरम्यान केकेआरनं मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघासाठी विकत घेतले. फ्रँचायझीनं मुस्तफिजूरला खरेदी करण्यासाठी ₹9.20 कोटी खर्च केले. मुस्तफिजूर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील बोली युद्धात सहभागी झाला होता आणि शेवटी, केकेआरनं बांगलादेशी खेळाडूला खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजली. मात्र, मुस्तफिजूरला खरेदी केल्यानंतर चाहत्यांनी केकेआरवर टीका करण्यास सुरुवात केली.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts