Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • दुबई विमानतळ पुन्हा टार्गेटवर! इराणने केला ड्रोन हल्ला, भारतीय नागरिकासह 4 जण गंभीर जखमी
Top News

दुबई विमानतळ पुन्हा टार्गेटवर! इराणने केला ड्रोन हल्ला, भारतीय नागरिकासह 4 जण गंभीर जखमी

Iran Drone Attack On Dubai International Airport | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच इराणने अमेरिका आणि इस्त्रायलवर क्लस्टर बॉम्ब टाकत सगळ्यात मोठा हल्ला केला होता. तर आता इराण आणखी आक्रमक झाला असून इराणने पुन्हा एकदा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Dubai International Airport) परिसरात हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह चार जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – ‘हा’ नियम पाळला नाही तर सिलिंडर मिळणार नाही; गॅस संकटामुळे सरकार अॅक्शन मोडवर

इराणकडून ड्रोनद्वारे दुबई विमानतळावर हल्ला

इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात दोन ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सुरक्षा यंत्रणांनी सतर्क होत इराणचे दोन्ही ड्रोन हवेतच नष्ट केले असल्याची माहिती समोर आली आहे.

सतर्क होत संयुक्त अरब अमिरातीच्या सुरक्षा यंत्रणांनी इराणचे दोन्ही ड्रोन हवेतच नष्ट केले. ड्रोन हवेत नष्ट केल्यानंतर त्याचे काही अवशेष खाली पडल्यामुळे यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. यामध्ये एका भारतीय नागरिकासह बांगलादेशी आणि एका घानाचा नागरिक जखमी झाला आहे. तर सध्या सर्व जखमी लोकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हल्ला झाल्यानंतरही दुबई विमानतळावरील कामकाज सुरू?

इराणने हल्ल्याच प्रयत्न केल्यानंतर दुबई विमानतळाच्या परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जरी इराणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असला तरी दुबई विमानतळावरील कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. विमानतळ तसेच आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली आहे. तसेच सर्व विमाने ठरलेल्या वेळेनुसार उड्डाण करत असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

दरम्यान, दुबईसह अमेरिका आणि इस्त्रायल देशावर इराणने आमि हिजबुल्लाहने संयुक्तपणे हल्ला केला आहे. इराणने क्लस्टर बॉम्ब टाकत अमेरिका-इस्त्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणने हे हल्ले संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर केले आहेत. तसेच इस्त्रायलच्या तेल अववीसह अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यामध्ये इस्त्रायलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणने इस्त्रायलसह कतारवर देखील हल्ले केले आहेत. मिसाईल, ड्रोन डागत इराणने कतारसह राजधानी दोहामध्येही हल्ले केले आहेत.

इराणकडून अमेरिकेचे हवाई तळ असलेल्या देशातही हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर इराणने हल्ला केला आहे या हल्ल्यात अमेरिकेची महत्त्वाची यंत्रणा नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) स्पष्ट केले की, अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या महत्त्वाच्या यंत्रणा नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या कतारमधील अल उदैद हवाई तळाला, इराकमधील हरिर हवाई तळाला आणि कुवेतमधील अरिफजान तळांना टार्गेट करण्यात आले आहे, असा दावा IRGC ने केला आहे.

 

 

 

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts