जालना पोलिसांनी शहरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या 65 बुलेट गाड्यांवर कारवाई करत त्या जप्त केल्या. सीनियर सिटीझन्सच्या तक्रारीनंतर ही मोठी मोहीम राबवण्यात आली. बुलेटच्या सायलेन्सरमुळे त्रास होत असल्याने पोलिसांनी गाड्या ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत जमा केल्या. पोलिस अधीक्षक अजय बंसल यांनी सायलेन्सर बसवणाऱ्या दुकानदारांवरही लवकरच कारवाईचा इशारा दिला आहे.
(RNO)












