जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज ९४.८८ टक्क्यांवर असून आवक केवळ ९७६ क्युसेकने सुरू होती. साठा ९८ टक्के वर आल्यावर आता मुख्य दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होईल तोही आवक बघून असे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिकसह वरील धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी महिनाभरात भरला. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी धरणातून विसर्ग सुरू केला होता. मात्र, सध्या आवक कमी झाल्याने विसर्ग बंद केला असून धरण ९८ टक्के भरल्यावर विसर्ग होणार आहे.












