Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कामठी चाकू हल्ला प्रकरण आता ‘डबल मर्डर’; उपचारादरम्यान १७ वर्षीय तरूणाचा मृत्यू
Top News

कामठी चाकू हल्ला प्रकरण आता ‘डबल मर्डर’; उपचारादरम्यान १७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Kamthi Double Murder

Kamthi Double Murder : नागपूरच्या कामठी भागात होळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेला आता भीषण वळण मिळाले असून हे प्रकरण ‘डबल मर्डर’मध्ये रूपांतरित झाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय मोहित दहाटचा ११ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. यापूर्वी याच हल्ल्यात १७ वर्षीय अरमान शौकत अली याची जागीच हत्या करण्यात आली होती. मोहितच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली.

चुकीचा मेसेजवरून वादाला सुरुवात

ही घटना १ मार्चच्या रात्री घडली, जेव्हा मच्छी पूल-कादर झेंडा परिसरातील ८ ते १० तरुणांनी अरमान आणि त्याच्या मित्रांना फोन करून ड्रॅगन पॅलेस परिसरात बोलावले होते. “माझ्या बहिणीला चुकीचा मेसेज का केला?” या कारणावरून तिथे वादाला सुरुवात झाली.

भीषण हल्ल्यात अरमानचा जागीच मृत्यू

हा वाद पाहता-पाहता हिंसक झाला आणि आरोपींनी धारदार चाकूने अरमानच्या पोटावर आणि डोक्यावर अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात अरमानचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मोहित दहाटवरही आरोपींनी पाठ आणि पोटावर चाकूने वार केले, तर यश गजभिये याच्या गळ्यावर वार करण्यात आले.

११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी मोहितची प्राणज्योत मालवली

तिन्ही जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी अरमानला मृत घोषित केले. गंभीर जखमी मोहित दहाटला नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी मोहितची प्राणज्योत मालवली.

फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

मोहितच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी कमसरी बाजारसमोरील कामठी महामार्गावर मृतदेह ठेवून रस्ता रोखून धरला. फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, तपास योग्य दिशेने सुरू असून सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. मात्र, यातील इतर सज्ञान आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts