गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, सर्वाधिक २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यामध्ये १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कणकवली-आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.












