गेल्या तीन- चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पाटण तालुक्यात हाहाकार माजला असून पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी आल्याने नेरळे पूल व मुळगाव पूल, पाबळनपाला रस्ता खचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही ठप्प झालेली वाहतूक आज सायंकाळपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे.