लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त भार सरकार सहन करू शकत नाही, त्यामुळे तिजोरीत खडखडाट असल्याने सरकारने अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली आहे. तब्बल ३० लाख लाडक्या बहिणींच्या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जात आहेत. यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अपात्र लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी भेट मिळणार नाही.












