बीड मधले वाढते गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनला आहे.आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून गीताई या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.












