नवी मुंबईत वाशी स्थानकावर पनवेलला जाणाऱ्या ट्रेनच्या छतावर ओव्हरहेड वायरमध्ये अडकून एक तरुण जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला वाशी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्या तरुणाचे कंपनी ओळखपत्र सापडले असून ओळखपत्रात मोबाईल नंबर नसल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस तपास सुरु आहे.












