मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की उत्तराखंडमधील परिस्थिती आता स्थिर असून महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप परतत आहेत. हरिद्वार-डेहरादूनपर्यंत आणून रेल्वेने घरी पाठवण्याची व्यवस्था झाली. काही मिनिटांचा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, पण सुदैवाने सर्व जिवंत परतले.












