स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येला अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हारगडाची सजावट पाहण्यासाठी भाविक देखील दाखल झाले आहेत. जेजुरीगडावर विविध उत्सवांच्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट केली जाते, तशाच प्रकारे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंदिराच्या परिसरामध्ये आकर्षक तिरंगा विद्युत रचना देखील केली जाते.












