ओबीसी समाजाच्या आरक्षण व हक्कांच्या मागणीसाठी निघालेली ‘मंडल यात्रा’ आज नागपूरहून चंद्रपूरात दाखल झाली. ७ ऑगस्ट १९९० रोजी लागू झालेल्या मंडल आयोगाच्या स्मरणार्थ ही यात्रा विदर्भातील सहा जिल्ह्यांतून जनजागृती करत आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना ही मुख्य मागणी असून यात्रेचा समारोप ७ ऑगस्टला भंडारा येथे होणार आहे.












