वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या महापुरामुळे परिसरातील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि नदीपात्राजवळ जाऊ नये, असे प्रशासनाने आवाहन केले












