मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. उद्यापासून ते आमरण उपोषणास सुरुवात करणार असून, यावेळी पाणी सुद्धा सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.












