बीडच्या वडवणी तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणाला तुला बायको करून देतो म्हणत नऊ जणांनी एक लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी बीडच्या वडवणी पोलिसात नऊ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एकाचा तर वाशिम जिल्ह्यातील दोघांचा आणि जालना जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. अधिकचा तपास पोलीसांकडून केला जात आहे.












