पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अवजड वाहनांवरील बंदीची वेळ २ तासांनी वाढवण्यात आली असून, आता सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत बंदी लागू असेल. चाकण, भोसरी, हिंजवडीसह इतर भागांत वाहतूक समस्या तीव्र झाली होती. त्यामुळे हा निर्णय नागरिकांसाठी तात्काळ दिलासा देणारा ठरणार आहे.












