रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अक्षरशः सलाईनवर चालू आहे. जिल्ह्यातील 53 प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत 288 उपकेंद्रांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते. मात्र डॉक्टर, आरोग्य अधिकारी, सेवक आणि सहाय्यक व आरोग्य सेविका महिला (नर्स ), अशी तब्बल 461 पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे. या रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी 8, आरोग्य पर्यवेक्षक 4,औषध निर्माण अधिकारी (पुरुष) 1,आरोग्य सहाय्यक महिला 6, आरोग्य सेवक महिला 321, आरोग्य सेवक पुरुष 30, प्रशिक्षित ताई 68, सफाई कामगार 2, महिला परिचर 21 या पदांचा समावेश आहे.












