छत्तीसगड उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना म्हटलं की, पती बेरोजगार असल्यामुळे पत्नीने वारंवार टोमणे मारणे व अपमान करणे हे मानसिक छळ मानला जाईल. या आधारावर 52 वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर करण्यात आला. न्यायमूर्ती राजनी दुबे आणि अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालात खालच्या न्यायालयाचा निर्णय उलथवून लावण्यात आला.












