छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात मोबाईल न दिल्याने फक्त 16 वर्षीय अथर्व तायडे याने डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या अथर्वने काही दिवसांपासून आईकडे मोबाईलसाठी हट्ट धरला होता. आईने नकार दिल्याने निराश होऊन त्याने रविवारी खवड्या डोंगरावरून उडी घेतली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला मोबाईल क्रेझ पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.












