बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव मजरा येथे दोन वर्षांच्या मुलीसह तिच्या आईचा गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांच्याच घरात मृतदेह आढळून आले. अंकिता बळीराम घवाडे वय २५ वर्षे तर शिवप्रिती बळीराम घवाडे २ वर्षे असे मयत दोघींचे नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये लहान मुलीला गळफास लावून स्वतः महिलेने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दरम्यान ही घटना नेमकी काय आहे हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.












