Mumbai Railway megablock : मुंबईच्या तीनही उपनगरी रेल्वेमार्गांवर रविवारी देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी तीनही मार्गांवरील उपनगरीय गाड्यांची वाहतूक नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे-कल्याण या दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्तीचे काम चालणार आहे. या दरम्यान या मार्गांवरून धावणाऱ्या अप आणि डाउन लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय मार्गाच्या जलद मार्गिकांवरून धावणार आहेत .
हेही वाचा – एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटनं प्रवाशाला मारहाण करुन केलं रक्तबंबाळ; आरोपी निलंबित
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सकाळी १०.३३ ते दुपारी १५.४९ दरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सकाळी ९.४५ ते दुपारी १५.१२ दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सकाळी ११.०२ ते दुपारी १५.५३ दरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सकाळी १०.०१ ते दुपारी १५.२० दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील .