भारत सरकारचे सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी रात्री शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले. साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल, श्रीफळ आणि साईंचा फोटो देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नगर दक्षिणेचे माजी खासदार. डॉ. सुजय विखे पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे आदी उपस्थित होते.












