नागपूरच्या नगरधनमध्ये दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या आर्मी जवानामुळे 30 नागरिकांचे जीव धोक्यात आले. आसाममध्ये कार्यरत हर्षपाल वाघमारे सुट्टीवर आला असताना मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. पादचाऱ्यांना कट मारत कार नाल्यात जाऊन पलटी झाली. संतप्त नागरिकांनी जवानाला रस्त्यात चोप दिला. सुदैवाने जीवितहानी टळली असून, पोलिसांनी जवानाला ताब्यात घेतले आहे.












