गेल्या तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.गोदावरी नदीकाठी असलेल्या गोवर्धन घाट येथील शांतिधाम स्मशान भूमीला पण्याने वेढा घातला आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून मुखेड तालुक्यात आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जनावरे सुद्धा दगावली आहेत. वरच्या भागात पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान गोदावरी काठी असलेली स्मशान भूमी पाण्याने वेढली गेली असून आणखी पाऊस झाल्यास ही स्मशानभूमि पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.












