नांदेडच्या बिलोली तालुक्यात चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागेली पानाच्या विड्याचा जबरदस्तीने सेवन करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी भोदू बाबासह चौघांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अघोरी प्रकार आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.












