नांदेड जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हाहाकार माजवला आहे, काल दुपारपासून नांदेड जिल्ह्यातील नायगाव, देगलूर ,बिलोली, धर्माबाद तालुक्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून ,धर्माबाद तालुक्यातील शिरखोड हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे मनुर, संगम, विळेगाव, बामणी या गावांचा संपर्क तुटला आहे, खबरदारी म्हणून पोलिसांनी शिरखोड पुला नजीक बॅरिकेटिंग लावून हा रस्ता बंद केला आहे












