पंढरपूरमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेस पारंपारिक दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले. श्री विठ्ठलास सोने मुकुट, नामनिळा, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, मोत्याचा तुरा, बोरमाळ, लक्ष्मीहार, तुळशीची माळ तर रूक्मिणीमातेस सोने मुकुट, तोडे, तानवड, जवमणी पदक, विविध हार व कंबरपट्टा यांसारखे अलंकार परिधान करण्यात आले. भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले.












