कन्नडच्या आमदाबाद शिवारातील रामचंद्र बनकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या सायाळ प्राण्याला निसर्गप्रेमी देविदास थोरात यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढले. नंतर त्याला नैसर्गिक वातावरणात सोडून दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












