VVPAT मशीन नसतील तर EVM ही नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या : प्रशांत जगताप
महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आता जलद गतीने सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने एक धक्कादायक निर्णय घेत निवडणुकीतील गैरप्रकारांना एक प्रकारे पोषक वातावरण तयार करण्याची भूमिका घेतली आहे. पुरेसे VVPAT मशीन्स उपलब्ध नाहीत असे निव्वळ बोगस कारण देत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत VVPAT मशीन वापरणार नसल्याचे जाहीर केले आहे. यावर पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने कठोर भूमिका घेतली असून निवडणूक प्रक्रियेत VVPAT नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अन्यथा आम्ही या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ अशी भूमिका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे. देशाच्या संसदेने विधानसभा व लोकसभा निवडणूक वगळता ईतर कोणत्याही निवडणुकीत EVM मशीन्स वापरण्याचा कायदा केलेला नाही. असे असताना जर निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेशा प्रमाणात VVPAT मशीन उपलब्ध नसतील तर EVM मशीनचा घाट कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.












