बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुसळधार पावसाच्या रेड अलर्टमुळे आज 19 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना दिल्या असून, अत्यावश्यक कारणास्तव वर्क फ्रॉम होमचा पर्याय ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.












