हिंगोलीच्या वाई गोरक्षणाथ येथे पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातून बैलमालक बैलजोडी घेऊन दर्शनासाठी येतात. त्यामुळे प्रशासनाने 22 ऑगस्टच्या रात्रीपासून महामार्गावरील बदल करण्यात आला आहे .या कालावधीत नांदेड कडून औंढा नागनाथकडे येणारी वाहने वसमत, झिरो फाटा, हट्टा, जवळा बाजारमार्गे नागेश वाडी असे पर्यायी मार्गाने छत्रपती संभाजी नगरकडे जातील. वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.












