पाकिस्तानमध्ये २६ जूनपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशभरात महापुरासारखी स्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. NDMA ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २९९ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये १४० बालकांचा समावेश आहे. याशिवाय, ७१५ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले असून, त्यात २३९ बालकं, २०४ महिला आणि २७२ पुरुषांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे १,६७६ घरं पूर्णपणे किंवा अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत, तर ४२८ जनावरंही मृत्युमुखी पडली आहेत. पूर, ढगफुटी, आणि दरड कोसळण्याच्या घटना अनेक भागांत घडत असून, प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कुटुंबं विस्थापित झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.












