बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात ही घटना घातपाताची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.












