२ ते ४ वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असलेली देयके त्वरित मिळावीत या मागणीसाठी लातूरमधील कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. तर इतर कंत्राटदार साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत. निधीअभावी देयके रोखल्याचा आरोप करत, देयके मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.












