यंदाच्या खरीप हंगामात पिकांवर फवारणी करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना 1एप्रिल ते आज पर्यंत घडल्या आहेत. खरीप हंगामात कपाशी, तूर यांसह फळपिकांवर फवारणी करण्यात येत आहे. मात्र, फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने मागील चार महिन्यात 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा कीटकनाशके फवारणी करताना सर्प दंशाने मृत्यू झाला आहे.












