धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोलीस कर्मचारी उमेश सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. निवडणूक यंत्रांच्या निगराणीसाठी ते ड्युटीवर होते. गोळी लागून ते गंभीर जखमी झाले असून त्यांना भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधीक्षक आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.












