वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी गावातील तलाव काल सायंकाळी फुटल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तलावातील पाणी शेतशिवारात पसरले असून शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.








