बीड जिल्ह्यात भारतीय डाक विभागाची नवीन 2.0 प्रणाली अद्याप कार्यान्वित न झाल्याने नोंदणीकृत कामकाज संथगतीने सुरू आहे. यामुळे टपाल सेवा विस्कळीत झाली असून रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावाला राखी पाठवणाऱ्या बहिणींनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. पूर्वी टीसीएस प्रणाली वापरण्यात येत होती, परंतु ती बदलून आता डाक विभागाने स्वतःची प्रणाली विकसित केली आहे, जी सध्या अडचणीत सापडली आहे.












