प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला 7 ऑगस्टपासून वरळी SVP स्टेडियममध्ये धमाकेदार सुरुवात झाली. 16 संघांतील 3200 हून अधिक गोविंदांचा सहभाग असून, 1.5 कोटींच्या बक्षिसांची लढत रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यात ब्रँड अॅम्बेसेडर ख्रिस गेल उपस्थित होता. महाराष्ट्राच्या दहीहंडी उत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश या लीगचा असून स्पर्धा 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.












