रायगड जिल्ह्यातील कशेने-इंदापूर परिसरात रात्रीच्या सुमारास एका बिबट्याचा वावर CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा बिबट्या एका घराजवळून जात असताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला. यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याचा वावर कशेने गावाच्या हद्दीत असलेल्या घराजवळ असल्यामुळे, ग्रामस्थांनी वनविभागाला तत्काळ याची माहिती दिली आहे. वनविभाग या घटनेचा गंभीरतेने विचार करत आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.
(RNO)












