महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांवर कबुतरांना खाणे घालण्याच्या जैन समाजाच्या आग्रहावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, “तुमच्या घरात उंदीर झाले तर गणपतीचं वाहन आहे म्हणून तुम्ही घरात ठेवता का? मग असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरतात?” अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. “आज रेल्वेखाली, खड्यात माणसं जात आहेत, पण कबुतरं मेली नाही पाहिजेत असं का? माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का?” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.












