रत्नागिरीत गणपतीपुळे रोडवरील हातखंबा येथे HP गॅस टॅंकरचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गॅस गळतीच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण आहे. या होणाऱ्या सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी महामार्ग रास्ता रोको आंदोलन केले. महामार्ग प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.












