मलकापूर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. पिकविमा 100% मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सोयाबीन–कापसाच्या धोरणात बदल व्हावा, सोलर कंपनीचे अतिक्रमण दूर करावे अशा विविध मागण्यांवर तुपकर आक्रमक झाले. मोर्चात शेकडो शेतकऱ्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंदवली गेली.












