बुलढाणा RTO कार्यालयातील महिला अधिकारी राजश्री चौधरीने एजंट इम्रान खानला कानशिलात लगावत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एजंटच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजश्री चौधरीवर गुन्हा नोंदवला आहे, तर अधिकारी महिलेच्या तक्रारीवरून एजंटवरही गुन्हा दाखल झाला आहे. आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना व एजंटला अधिकारी शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.












