शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पूजा साहित्याच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व दुकानांवर दरफलक लावणं आणि वस्तूंवर MRP व एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. महागडे दर लावून फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार आहे. दुकानदारांना चढ्या दराने विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.












