ऑस्ट्रेलियाच्या 130 मिलियन डॉलरच्या “Come and Say G’Day” या आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची भारतातील ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचं निसर्गसौंदर्य, विविध संस्कृती आणि साहसी पर्यटन अनुभव भारतीय तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सारा करणार आहे. या मोहिमेचा उद्देश भारतातील युवा वर्गाला आकर्षित करून ऑस्ट्रेलियातील पर्यटन वाढवण्याचा आहे. “Ruby the Roo” या अॅनिमेटेड कांगारूसह सारा विविध डिजिटल आणि व्हिज्युअल माध्यमातून मोहिमेत सहभागी होणार आहे. यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियातील पर्यटन संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












