बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून बोरगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












